गिरिजात्मज (लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या
तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत.
त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायरया चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नांव पडले.
आख्यायिका
पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नांव मिळाले.
कसे जावे
लेण्याद्रीला जाण्यासाठी पुणे- जुन्नर अंतर ९४ किलोमीटर आहे. पुणे ते जुन्नर एस.टी. बस गाड्या पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकावरून सुटतात. खुद्द जुन्नरहून लेण्याद्री फक्त ४ किलोमीटर आहे. मात्र वाटेत नदी लागत असल्याने खास मोटार करूनच जावे. तसेच जुन्नरहून लेण्याद्रीला जाण्यास एस.टी.ची सोय आहे. हे देवस्थान डोंगरात असून, २८३ पायऱ्या चढाव्या लागतात. वृद्धांना डोलीतून नेण्याची सोय आहे. पुणे- नाशिक हायवे- चाकण- राजगुरुनगर- मंचर नारायणगाववरून जुन्नर रोड असा मार्गक्रम आहे.
No comments:
Post a Comment