Saturday, 27 October 2012
रांजणगावचा महागणपती
मंदिर
येथील मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून त्याचे कपाळ मोठे आहे.येथीलमूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीला 10 सोंड व 20 हात होते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडती, अशी मंदिराची रचना आहे.रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असुन मंदिरात दिशासाधन केले आहे.त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यानकाळी गणेशाच्या मूर्तीवर किरण पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मुर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला रिध्दी-सिद्धी उभ्या आहेत.दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.
इतिहास
या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. त्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले.
आख्यायिका
रांजणगाव हे दुसरे अष्टविनायकांपैकी स्थान. त्याला गणपतीचे रांजणगाव असे म्हणतात. हे स्थान शिरूर म्हणजे घोडनदीच्या अलीकडे पुण्याजवळ आहे. त्रिपुरासुराने गजाननाकडून वरप्राप्ती झाल्यानंतर सर्व जग पादाक्रांत करण्याचे ठरवून स्वर्गावर स्वारी केली व देवांच्या सैन्याची दाणादाण उडवून स्वर्ग, पाताळ सर्व हस्तगत केले. सर्व जग त्या असुराच्या त्रासाने भयग्रस्त झाले. याला उपाय म्हणून नारदांनी देवांना गजाननाची उपासना करण्याचा उपदेश केला. देवांनी आठ श्लोकयुक्त स्तोत्राने गणेशाची स्तुती केली. ते स्तोत्र संकटनाशनस्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शंकरांनी ज्या क्षेत्रात तपश्चर्या करून त्रिपुरासुरावर विजय मिळविला ते हे क्षेत्र. येथे त्यांनी मणिपूर नावाचे नगर वसविले तेच हे रांजणगाव.
देवालय पूर्वेकडे तोंड करून आहे. देवळात सभामंडप आहे. पेशव्यांच्या पदरी असलेले सरदार पवार व शिंदे यांनी इथल्या ओवऱ्या बांधल्या. देवळाच्या आतला मूर्तीचा गाभारा आणि बाहेरचा गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधली आहे.देवळात आज असलेल्या पूजामूर्तीच्या खाली तळघरात दुसरी एक लहान मूर्ती आहे तीच खरी श्रींची मूळमूर्ती. या मूर्तीला १० सोंड व २० हात आहेत असे म्हणतात.
या देवळानजीकच एक दुष्काळातही पाणी न आटणारी विहिर आहे. रांजणगाव देवस्थानास मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, यशवंतराव चंद्रचूड इत्यादींकडून इनामे मिळाली होती. पूर्वी भोर संस्थानकडूनही मदत मिळत असे. थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव इनाम करून दिलेला आहे.
मंदिरात आज पूजेकरिता असणाऱ्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. मूर्ती दिसायला सुंदर आहे. आसन मांडीचे आहे. मूर्तीचे कपाळ रूंद आहे. भाद्रपद चतुर्थीला उत्सव फार मोठ्या प्रमाणावर होतो. हा गणपती नवसाला हटकून पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील पुजारी व क्षेत्रोपाध्ये यांच्या मार्फत राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकते.
कसे जावे
पुणे- अहमदनगर रस्त्यावर शिरूर तालुक्यात पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर हे देवस्थान मुख्य रस्त्याला लागून आहे. येथे जाण्यासाठी तासाच्या अंतराने एस.टी. बसेस आहेत. पुणे- वाघोली- भीमा कोरेगाव- शिक्रापूर- रांजणगाव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment